रविवार, १ जानेवारी, २०२३

मृत्यूयोग

||श्री|| 

मागील लेख :- बेरकी चंद्र आहे साक्षीला.


मृत्यूयोग




मनोरंजन विश्वातील तुनिषा शर्मा हिच्या मृत्यूने बरीच खळबळ माजवली आहे. त्या निमित्ताने सुशांतसिंह चा मृत्यूही परत चर्चेत आला. मनोरंजन विश्वातील असाच एक मृत्यू कलाप्रेमींना हळहळायाला लावून गेला तो म्हणजे सिद्धार्थ शुक्ला. वरील दोन मृत्यू प्रमाणे हा आत्महत्या/घातपात नव्हता. सिद्धार्थाच्या अकाली मृत्यूने कलाविश्व हळहळल होते. या लोकप्रिय अभिनेत्याचा हृद्यविकाराने मृत्यू झाला होता. त्या वेळी ज्योतिष वर्गात विद्यार्थ्यांना कुंडलीचे विस्तृत विश्लेषण समजाऊन दिले होते. त्याच्या नोंदी मी त्या वेळी ठेवल्या नव्हत्या कारण शिकवतांना ओघात कुंडली विश्लेषणा साठी मांडली होती. आता परत थोडा विचार त्यावर मांडत आहे.

सिद्धार्थचा ४१ व्या वर्षी अकाली मृत्यू झाला. जन्म टिपण सोशलमीडियातून घेतले आहे त्यामुळे नेहमी प्रमाणे त्याच्या विश्वासहार्तते बाबत साशंकता आहे.  

सिद्धार्थ शुक्ला १२/१२/१९८०, दु.१२:००, मुंबई. मृत्यू - ०२/०९/२०२१, सका.१०:३०, मुंबई.

कुंभ लग्नाची कुंडली येते. मधली कुंडली जन्मलग्न कुंडली आहे तर बाहेरची कुंडली हि मृत्यूवेळेचे गोचर आहे. ४१ व्या वर्षी मृत्यू म्हणजे अल्प-मध्यायू योग झाला. वय वर्षे ३३ ते ४६ मृत्यू हा अल्प-मध्यायू योग होतो. लग्नेश शनि अष्टमात षष्ठेश चंद्राच्या नक्षत्रात म्हणजे लग्नेशाचा संबंध ६,८,१२ आला त्यामुळे तो निर्बली झाला. शनि स्वत: व्ययेश असून त्याचा नक्षत्रस्वामी चंद्र व्ययात आहे. शनि हा मारकेश गुरु युतीत आहे. खरे तर अष्टमातील गुरु आयुष्ययोगास बरा असतो व मरण शांततेत येते. पण येथे तो मारकेश आहे त्यामुळे आयुष्यवर्धक जरी नाही ठरला तरी येथील शनिचे जे फळ आहे दीर्घकालीन आजार, खितपत पडून मृत्यू ते मात्र त्याने टाळले. अष्टमस्थान शनीचे कारक स्थान आहे येथे तोही दीर्घायू देवू शकतो, मित्र राशीत आहे पण मारक संबंध आला. अष्टमेश बुध अस्तंगत आहे पण तो बलवान केंद्रात आहे. बुध वर्गोत्तम आहे. बुध लग्नेशाच्या नक्षत्रात आहे त्यामुळे तो लग्नेशा पेक्षा बलवान ठरतो आहे. अष्टमेश हा हि मारकेश रवि युक्त असल्याने त्याचे मारकत्व वाढले. बाधकेश शुक्र कोणात स्वराशीत आल्याने बलवान आहे. शुक्राची शुभ फले जाताकास मिळाली असली तरी बाधकेश बलवान होणे आयुष्य विघातक असते. त्यात लग्नेश तितका बलवान नाही. लग्न लग्नेश शुभसंबंधित नाही. हृद्य कारक रवि अष्टमेश बुध युक्त असून अष्टमेशाच्या नक्षत्रात असल्याने हृदयविकाराने मृत्यू झाला.

मृत्यू गुरु महादशेत राहू अंतर्दशेत शनि विदशेत झाला. गुरु अष्टमात षष्ठेशाच्या नक्षत्रात असून मारकेश आहे. जातक पारिजात मध्ये एक विधान आहे “लग्नेश/अष्टमेश हे इतर ग्रहा बरोबर असता दोघात जो बलहीन त्याची दशा मृत्यूकारक समजावी.” लग्नेश शनि गुरु बरोबर आहे. शनि पेक्षा गुरु जास्त बलहीन आहे. हि युती बुधाच्या राशीत आहे. शनि बुध मित्र आहेत तर गुरु बुध शत्रू. वृषभ नवमांशात हि युती झाली आहे, येथेही गुरु शत्रू नवमांशी आहे. त्यामुळे गुरु महादशा क्षेमकारक असूनही त्यात मृत्यू झाला. राहू षष्ठात अष्टमेश बुधाच्या नक्षत्रात आहे व त्याचा राशीस्वामी चंद्र व्ययात आहे. राहूची महादशा विपतकारक असूनही मारक ठरली नाही कारण ती वयाच्या ९ ते २७ वर्षा दरम्यान होती. पण राहुलाही मारकत्व असल्याने त्याची अंतर्दशा मारक ठरली.  विदशानाथ शनि अष्टमात मारकेश गुरु युतीत अष्टमेशाच्या नक्षत्रात आहे. शनि लग्नेश असूनही मारक ठरला. मध्यायू योगात पाचवी दशा मृत्यूदायक ठरू शकते. शनि महादशा प्रत्यर दशा आहे आणि ती मध्यायू कालखंडात येते. गुरु महादशा मार्च २०२३ मध्ये संपणार होती, मग नियतीने जातकाला दीड दोन वर्षेही का दिली नाही? हा नियम लावला तर शनि महादशेत बुध अंतर्दशेत राहू विदशेत म्हणजे साधारण ४७/४८ व्या वर्षी काळ यायला हवा होता. जन्मवेळी श्रवण नक्षत्र ११ डिसें. दु. २:४१ ते १२ डिसें. दु. ३:०२ पर्यंत होते. जन्मवेळे बाबत साशंकता आहे. जन्मतारीख १२ डिसें. आहे. आंग्ल दिना नुसार चंद्र मकरेत १५ अंश ५ कला ते २८ अंश १८ कला दरम्यान असतांना जातकाचा जन्म झालेला असू शकतो. जर दु.३:०२ नंतर जन्म असेल तर जन्मत: भोग्य महादशा मंगळाची असेल, अर्थात सगळे नक्षत्र गोचर बदलेल.  अगदी मीन नवमांश दरम्यान जरी जन्म धरला तरी निदान विदशा बदलेल. शिवाय वेळ बदलली म्हणजे लग्न बदलेल अर्थात योग बदलतील.     

ग्रहांची चंद्रा पासून विशिष्ट राशीतील भ्रमणे मृत्यू दायक ठरू शकतात. आंग्ल दिवसभरात कधीही जातकाचा जन्म झाला असेल तर म्हणजे १२ डिसे. १९८० ला आंग्ल दिवसभरात रास बदलत नाही. रवि, मंगळ, गुरु, शनि जेव्हा जन्मस्थ चंद्रा वरून, त्याच्या अष्टमातून वा व्ययातून गोचर करतात तेव्हा मृत्यू देवू शकतात. अर्थात जन्मकुंडलीतील योग, दशा यांच्या अनुसंगाने याचा विचार करावा लागतो. नाहीतर नुसत गोचरीच तुणतूण वाजवण्यात काही अर्थ नाही. अस तुणतूण वाजवत बसाल तर मग रवि दर वर्षी तीनदा मृत्यू दायक ठरेल. असो, मृत्यू समयी रवि, मंगळ चंद्राच्या अष्टमातून गोचर करीत होते. मृत्यू साडेसातीत झाला आहे. गोचर शनि व्ययात षष्ठेश चंद्राच्या नक्षत्रात होता अर्थात चंद्रा वरून गोचर करत होता. २२ व्या द्रेष्काणाचा स्वामी शनिच आहे व गोचर शनीचे मकर या २२ व्या द्रेष्काणातून भ्रमण होते. लग्ना पासून व्दितीयेश (मारकेश) गुरु चे चंद्राच्या मारक स्थानातून गोचर होते. पण लग्न निश्चित नसल्याने या गोचराला महत्व देता येणार नाही. विचार करता मला वाटते कि जातकाचा जन्म मिथुन लग्नावर साधारण सायं. ६:१२ ते ८:२३ दरम्यान झाला असावा, अंदाज आपला.
पुढील लेख लवकरच.....

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा