|| श्री ||
काळवेळेचे गणित चुकते कसे ? - १
मागील भागात आपण आयुर्दाया संबंधी
विचाराधीन कुंडलीत काही ग्रह योग पाहिले. मागील दोन भाग वाचण्या साठी त्यावर क्लिक
करा.
मागील लेख :- १)काळवेळेचे गणित चुकते कसे?-१.
२)काळवेळेचे गणित चुकते कसे?-१/२.
जैमिनी पद्धत:- होरा लग्न मकर आहे.
लग्नेश व अष्टमेश = दीर्घायू, लग्न व चंद्ररास = अल्पायु, लग्न व होरा = मध्यायू.
तिन्ही युग्मकांनी दिलेला आयुर्दाय भिन्न असल्याने लग्न व होरा युग्माचा आयुर्दाय
घ्यावा लागेल. शनी जन्म लग्नेश व होरा लग्नेश असल्याने तो कक्षाऱ्हास अथवा कक्षावृद्धी
करतो का ते पहावे लागेल. शनी उच्चराशीत आहे. शनिवर शुक्र व चंद्र या शुभ ग्रहांची जैमिनी
दृष्टी आहे. त्यामुळे
या बलवान व शुभग्रह संबंधित शनीने कक्षावृद्धी करावयास हवी होती पण तसे इथे घडले
नाही. शनी वक्री असल्याने तसे झाले नसावे.
ग्रुपवर चर्चेत एक
उपप्रश्न निर्माण झाला तो म्हणजे एवढा झटपट मृत्यू कसा? माझ्या मते हा मृत्यू झटपट
म्हणता येणार नाही. तसे पाहिले तर हृदय विकाराचे कारण मधुमेह असल्याने मृत्यूचे
कारण मधुमेह आहे. निदान झाले तेव्हा पासूनचा जरी विचार केला तरी ५ वर्षा नंतर
मृत्यू झाला. हा दीर्घ कलावधी झाला. आता यात एक प्रश्न निर्माण होतो कि
मधुमेहामुळे हृदय विकारच का झाला? मधुमेहा मुळे शरीरात अन्यही काही दोष निर्माण
होऊ शकतात ज्या मुळे मृत्यू येवू शकतो. काहीत तुलनेत दीर्घकाळ (काही दिवस, महिने) म्हणता
येईल अशी झुंझ देवून मृत्यू होतो. उदा. मधुमेह रुग्नांमध्ये किडनी दोष ही होतो जो
घातक ठरतो. मग जातकास मृत्युदायक हृदय विकाराच का? किडनी दोषाने हृदय विकार इतका
झटपट मृत्यू येत नाही. हृदय विकाराची कारण मिमांशा वर केली आहेच. झटपट कि दीर्घ
झुंझ? अश्या प्रश्नाचा जर विचार करायचा असेल तर शास्रात एक पद्धत आहे. अष्टमाच्या
जीव व शरीरा वरून. बघू या काय येते ते. या कुंडलीत अष्टमाचा जीव – शुक्र व शरीर –
चंद्र आहे. यांच्या बलाबलावर हे ठरते. प्रथम दर्शनी जीव बलवान वाटतो तो मालव्ययोग,
योगकारक मुळे. शरीर उच्च आहे म्हणजे बलवान आहेच. मालव्य योगा बाबत भावचलीता कडे
बघितल्यास तो होत नाही तर केंद्राधीपत्य व बाधकत्वा मुळे योगकारकत्व बाधित होते.
चंद्र हि षष्ठेश आहे. म्हणजे जीव शरीर पेक्षा दुर्बल होतो आहे कारण बाधकत्व हे षष्ठत्वापेक्षा
मारक ठरते. भावचलितात जीव स्वराशीत तर शरीर उच्चराशीत आहे. शरीर स्वनक्षत्री आहे. परिणामी
प्राण झटपट जातो.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा