काळवेळेचे गणित चुकते कसे ?
मागील भागात आपण आयुर्दाया संबंधी
विचाराधीन कुंडलीत काही ग्रह योग पाहिले. मागील भाग वाचण्या साठी येथे क्लिक करा. मागील लेख :- काळवेळेचे गणितचुकते कसे?-१. आता पुढे पाहू......
रवीला कुंडलीत बलवत्ता नसता आयुष्ययोगास विघातक
होतो. या विषयी सर्वार्थ
चिन्तामणी मधील श्लोक काय सांगतो ते पाहू.
जैमिनी पद्धत:- होरा लग्न मकर आहे.
लग्नेश व अष्टमेश = दीर्घायू, लग्न व चंद्ररास = अल्पायु, लग्न व होरा = मध्यायू.
तिन्ही युग्मकांनी दिलेला आयुर्दाय भिन्न असल्याने लग्न व होरा युग्माचा आयुर्दाय
घ्यावा लागेल. शनी जन्म लग्नेश व होरा लग्नेश असल्याने तो कक्षाऱ्हास अथवा कक्षावृद्धी
करतो का ते पहावे लागेल. शनी उच्चराशीत आहे. शनिवर शुक्र व चंद्र या शुभ ग्रहांची जैमिनी
दृष्टी आहे. त्यामुळे
या बलवान व शुभग्रह संबंधित शनीने कक्षावृद्धी करावयास हवी होती पण तसे इथे घडले
नाही. शनी वक्री असल्याने तसे झाले नसावे.
प्रश्नकर्तीचा
असा काही हेतू नसावा. “अस का झाल असाव?” या त्यांच्या प्रश्ना वरून
माझाच गैरसमज झाला कि विवाह लाभला नसावा का? अस काही विचारायच आहे कि काय? असो,
गैरसमजाने या दृष्टीने तपासणी करून बघावी म्हणतो. प्रत्येक कुंडलीतच सप्तमेश हा
मारकेश असतो. या कुंडलीत तो रवी आहे. तो अष्टमेश बुध युक्त आहे हि बाबा या
दृष्टीने विचारात घ्यावी. दुसरी गोष्ट म्हणजे विवाह कारक शुक्र हा षष्ठेश चंद्र
युक्त आहे. कारक व भावेश दोन्हीचा रिपू व रंध्र स्थानाशी संबंध विवाहाच्या
दृष्टीने अप्रिय घटना दर्शवितो. (जातकाच्याच
कुंडलीत हे योग असल्याने जोडीदारास दोष देवू नये.) तसे
पाहिले तर जरी विवाहानंतर दोन महिन्यांनी मधुमेहाचे निदान झाले असले तरी तो या
पूर्वी काही काळ अगोदर पासून असणार.
मृत्यूचे कारण हृदय विकार असले तरी आता हे सर्वज्ञात आहे कि मधुमेहामुळे हृदय, किडनी
यांवर गंभीर परिणाम होतात. जातकाची रक्तशर्करा नियंत्रणात नसावी कारण पायाची जखम
चार वर्ष होती अशी माहिती प्रश्नकर्तीने दिली आहेच. षष्ठेश चंद्र हा प्रबळ मारकेश
गुरुच्या प्रतीयोगात आहे, शिवाय गुरूची षष्ठावर दृष्टी हि आहे त्या मुळे मधुमेह
झाला तर हृदयावर अंमल असलेला रवी अष्टमेश युक्त असल्याने मृत्यूस हृदयविकार
कारणीभूत झाला.
अजून एक उपप्रश्न ग्रुप वर चर्चेत उपस्थित झाला त्या विषयी व इतर गोष्टी पुढील भागात पाहू. धन्यवाद.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा